पुणे: गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील हवामान बदलले आहे, काही भागात हलक्या सरी पडत आहेत तर काही भागात वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि त्याच्या उपनगरांमध्ये दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तथापि, हलक्या पावसामुळे विदर्भ आणि मराठवाडा सारख्या भागात उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळ आणि जोरदार वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रापासून ते तामिनळनाडूपर्यंत कमी दाबचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पावसासाठी पूरक वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील विविध शहरांमधील तापमानात बदल झाला आहे, पुण्यात कमाल तापमान ३२.८ अंश सेल्सिअस आणि किमान २०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत मुंबईत हलक्या पावसाची शक्यता आहे.