हवामान: महाराष्ट्रातील हवामानात सध्या झपाट्याने बदलत आहे, राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. बदलत्या हवामान पद्धतींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील बहुतेक ठिकाणी तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तापमानवाढीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचे सावट असलेल्या भागात शेतकरी चिंतेत असून त्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. झपाट्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना नेमके करायचे काय? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, आज राज्यात कसे असेल हवामान ते आपण जाणून घेणार आहोत.
शहरनिहाय तापमान:
-मुंबई: किमान तापमान सुमारे २६° सेल्सिअस, तर कमाल तापमान ३३° सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. शहरात अंशतः ढगाळ आकाश राहील.
– पुणे: किमान तापमान सुमारे २५° सेल्सिअस, तर कमाल तापमान ३९° सेल्सिअस राहील. दिवसा शहरात निरभ्र आकाश राहील, संध्याकाळी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
– छ. संभाजीनगर: किमान तापमान सुमारे २४° सेल्सिअस, तर कमाल तापमान ४०° सेल्सिअस राहील. शहरात निरभ्र आकाश राहील.
– नाशिक: किमान तापमान सुमारे २३° सेल्सिअस, तर कमाल तापमान ३९° सेल्सिअस राहील. शहरात निरभ्र आकाश राहील.
– नागपूर: किमान तापमान सुमारे २३ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. शहरात वादळी वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भासाठी यलो अलर्ट
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील तापमान वाढत आहे, राज्यात तापमान वाढीचा आणि अवकाळी पावसाचा खेळ सुरू आहे. उष्णता वाढत असताना, राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे. नागरिकांना बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.