पुणे: राज्यातील तापमान कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात ५ ते ७ अंश सेल्सिअसने घट झाली असून, शहरात उष्णतेपासून दिलासा मिळत आहे. रविवारी पुणे शहरातील तापमान ३६.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, ज्यामुळे रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला. हवामान अंदाजानुसार, पुणे शहरातील कमाल तापमान आज ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. दिवसा हवामान अंशतः ढगाळ राहील, काही प्रमाणात सूर्यप्रकाश असणार आहे.
रविवारी किती होते तापमान,
शिवाजीनगर- 36.9 अंश
हडपसर -36 अंश
वडगावशेरी 35.5 अंश
मगरपट्टा -36.8 अंश
कोरेगाव पार्क 36.6 अंश
हवामान विभागाने मंगळवार, ६ मे पासून हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली असून पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे ३७-३८ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.