Junner News शिरूर : पावसाची संततधार, हिरवेगार डोंगर अन सगळीकडे पाणिच पाणी यातच अधून मधून धुक्याची वलई अंगाला स्पर्श करून गारवा देते. डोंगराच्या उंच कड्यावरून फेसाळणारे पाणी आणि लहान लहान धबधब्यावर चिंभ भिजणारी तरूणाई यामुळे जुन्नर तालुक्यातील घाटमाथ्यांवर निसर्ग खुलल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या आगमनाने या भागात पर्यटकांची गर्दी पहावयास मिळू लागली आहे.(Junner News)
खरे तर जून महिण्याच्या सुरूवातीपासून पावसाचे आगमन होते. मात्र या वर्षी उन्हाचा चटका जुलै महिन्यात अनुभवयास मिळाला. पाऊसाची संततधार सुरू झाली आणि संपुर्ण भागच जणू हिरवाई नटलेला पहावयास मिळू लागला आहे.(Junner News)
डोंगरमाथ्यांवर ढगांनी केलेली गर्दी आणि त्यामुळे परिसरात झालेला बदल पहावयास मिळू लागला आहे. डोंगरकड्यावरून फेसाळणारे पाणी दिसू लागले आहे. या भागात विशेषतः या भागात काही ठिकाणी धबधब्यातून उलटे वाहणारे पाणी अनुभवयास मिळतात. त्यामुळेच या परिसरात पर्यटकांचे पाय आपोआपच वळू लागतात.
दार्याघाट, नाणेघाट, दुर्ग ढाकोबा, दुर्गवाडी, हातविज, कोकणकडा या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक पहावयास मिळतात. या बरोबर सुरू झालेली भात अवनी करताना शेतात राबणारा शेतकरी पहावयास मिळतो. सकाळ पासून उशीरा पर्यंत या भागात पर्यटक रेंगाळतो. त्यातून लहान लहान व्यवसायीकांचा रोजगार वाढलेला पहावयास मिळतो.(Junner News)
माळशेज घाटात बंदी केल्याने जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळाकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात वळाला आहे. येथे निसर्गाने हिरवा शालू परिधान केला असून धबधब्यांची संख्या वाढलेली पहावयास मिळत आहे. लहान लहान धबधब्यांवर लहान मुलांपासून तरूण व वयोवृद्ध देखील आनंद लुटताना पहावयास मिळू लागली आहेत. ओढे नाले देखील वाहू लागल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.(Junner News)