नवी दिल्ली : सध्या अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube चा पर्याय निवडला जातो. आपल्या युजर्ससाठी YouTube कडून अनेक बेस्ट असे फीचर्स आणले जातात. त्यात आता YouTube ने आपल्या प्रीमियम प्लॅनमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे. या नवीन फीचरमुळे तुमच्या आवडीचे व्हिडिओ तुम्हाला लिस्टनुसार पाहता येणार आहे.
YouTube चे हे एक पर्सनल असे फीचर आहे. हे फिचर सध्या अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध आहे. Google पर्सनल फीचर्सवर वेगाने काम करत आहे. गुगलनुसार, हे फीचर्स कंटेंट शोध सुधारण्यास फायदेशीर असे ठरत आहे. या नवीन फीचर्सच्या माध्यमातून, युजर्स त्यांच्या व्हिडिओ लिस्टनुसार व्हिडिओ अगदी सहजपणे पाहू शकतात.
असा घेता येईल फीचर्सचा फायदा…
– सर्वप्रथम Add to queue पर्यायावर टॅप करा.
– यानंतर, तुम्हाला नंतर पाहू इच्छित व्हिडिओ निवडा.
– यानंतर यूट्यूब ॲपमध्ये तुमची queue उघडा.
– तुमची queue नंतर सुचविलेल्या व्हिडिओंसह एकत्र केली जाईल.
– तुम्हाला सूचना आवडल्यास, तुम्ही ती queue मध्ये जोडण्यासाठी त्यावर क्लिक करू शकता.
– queue च्या सुरूवातीस किंवा शेवटी सुचवलेला व्हिडिओ जोडण्यासाठी, त्यापुढील तीन डॉटवर टॅप करा.