नवी दिल्ली : सध्या कोणतेही कार्यालयीन संभाषण असो e-mail हा केला जातो. या e-mail च्या माध्यमातून मजकूरासह फोटो अथवा कोणतीही फाईल पाठवता येऊ शकते. पण, अनेकदा मेल हा इंग्रजीमध्ये असतो तेव्हा तो वाचण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी कसरत करावी लागते. मात्र, तुमची ही समस्या दूर होऊ शकणार आहे.
Gmail वरून तुम्ही महत्त्वाच्या फाईल्स सेंड करू शकता. आता गुगलने आपल्या Gmail साठी एक नवीन फीचर आणले आहे. ज्यामध्ये युजर्सला आपले ई-मेल ट्रान्सलेट करता येणार आहेत. तर Gmail मध्ये गुगलने आणलेल्या या फीचरचा फायदा युजर्संना होणार आहे. गुगलने जीमेलसाठी आणलेल्या फीचरच्या मदतीने ई-मेल ट्रान्सलेट करता येणार आहेत.
हे फीचर Android आणि iOS डिव्हाईसेससाठी लाँच करण्यात आले आहे. हे फीचर आलेल्या e-mail ची भाषा ओळखते आणि ईमेल ऑटोमॅटिक ट्रान्सलेट करते. आधी हे फीचर डेस्कटॉप व्हर्जनसाठी होते. तसेच 100 पेक्षा अधिक भाषांमध्ये ट्रान्सलेट करता येणार आहे.