पुणे प्राईम न्यूज: आयटी नियम 2021 अंतर्गत सर्व मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला वापरकर्ता सुरक्षा अहवाल प्रसिद्ध करावा लागतो. या नियमांतर्गत ट्विटरने (आता X) सप्टेंबर महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केला असून कंपनीने मोठ्या संख्येने भारतीय ट्विटर खात्यांवर कारवाई केली आहे. एलॉन मस्कच्या ट्विटरने 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान 5,57,764 भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. यापैकी बहुतेक खाती कंपनीच्या नियमांच्या विरोधात जाऊन लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि सहमत नसलेल्या नग्नतेला प्रोत्साहन देत होती. म्हणजे त्यांच्याकडून प्लॅटफॉर्मवर न्यूडिटी पोस्ट केली जात होती.
या काळात कंपनीने दहशतवादाला प्रोत्साहन देणारी 1,675 खाती कायमची बंद केली आहेत. एकूणच कंपनीने 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान प्लॅटफॉर्मवरून 5,59,439 खात्यांवर बंदी घातली आहे.
तीन हजारांहून अधिक तक्रारी
याच कालावधीत कंपनीकडे 3,076 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी खाते निलंबनाविरोधात अपील करणाऱ्या ११६ तक्रारींवर कंपनीने कारवाई केली. तथापि, परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर कंपनीने यापैकी 10 खाती पुनर्संचयित केली. तर इतर सर्व खात्यांवर कायमची बंदी घालण्यात आली आहेत.
मासिक सुरक्षा अहवालात कंपनीने म्हटले आहे की, सर्वाधिक तक्रारी गैरवर्तन/छळवणुकीच्या (1,076) होत्या. यानंतर घृणास्पद वर्तन (1,063), बाल लैंगिक शोषण (450) आणि अडल्ट कंटेंट (332) च्या तक्रारी प्राप्त झाल्या. गेल्या महिन्यात 25 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान कंपनीने 12,80,107 खाती बंद केली होती, तर जून महिन्यात 18,51,022 खाती कायमची बंद करण्यात आली होती. जर तुम्ही प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सामील असाल, तर कंपनी तुमचे खाते देखील बॅन करू शकते. लक्षात ठेवा, फक्त अकाउंट रिपोर्ट झाल्यानंतरच तुमचे खाते बॅन केले जाईल असे आवश्यक नाही, कंपनी स्वतः खात्यावर कारवाई करू शकते. जर तुम्हाला तुमचे ट्विटर खाते सुरक्षित ठेवायचे असेल, तर प्लॅटफॉर्मचे नियम लक्षात ठेवा. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नका.