Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पहाटेच्या शपथविधीची शरद पवार यांना कल्पना नव्हती, छगन भुजबळांवर पलटवार; सुप्रिया सुळेंच्या डायरीत दडलंय काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 October 2023, 14:31

Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकीय धोरणे आणि धरसोड वृत्तीवर बोट ठेवत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल अनेक धक्कादायक खुलासे केले. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा रंगली असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळांची प्रत्येक मतं खोडून काढली आहेत. डायरी लिहिण्याची मला लहानपणापासूनची सवय आहे. माझी डायरी माझा रेफरन्स पॉइंट आहे, असे म्हणत त्यांनी पर्समधून काही कागद काढले आणि भुजबळ कोणत्या मिटींगबद्दल बोलले? त्यामागचे संदर्भ काय? याची पडताळणी करून मुद्द्यांची यादीच वाचून दाखविली.

सुप्रिया सुळे यांनी भुजबळांची मतं खोडून काढली

या वेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा नवरा काही बोलला तरी मी डायरीत लिहीते. त्यामुळे २ जुलैच्या शपथविधीच्या रात्री काय घडलं हे मी छातीठोकपणे सांगू शकते.(Pune News)  मला सगळं धडधडीत आठवतंय. स्फोट होईल असं माझ्या आयुष्यात काहीही नाही. या वेळी सुळे यांनी भाजपचं नामकरण ‘भ्रष्ट जुमला पार्टी’ म्हणजेच बी.जे.पी. असं केलं. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न बेदखल करून, भाजप वेगळ्याच विषयांचे राजकारण करत असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, छगन भुजबळ यांनी त्यांच्या मुलाखतीत कबुली दिली आहे की अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी आणि २ जुलैचा शपथविधी हे दोन्ही निर्णय त्यांनी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतले आहेत. दोन्ही गोष्टी शरद पवारांना न सांगता केल्या होत्या.(Pune News)  समाजात अनेकवेळा याबाबत चर्चा होते. परंतु, भुजबळांच्या कालच्या मुलाखतीतून स्पष्ट झालं आहे की या दोन्ही गोष्टी शरद पवारांना माहिती नव्हत्या. शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असूनही अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीची त्यांना कल्पना नव्हती. हे दोन्ही निर्णय त्यांना अंधारात ठेवून घेतले होते.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अनेक जण शरद पवार यांच्या विचारधारेवर प्रश्न उपस्थित करतात. परंतु, छगन भुजबळांनी काल स्वतः सांगितलं, ‘अनेक वेळा आम्ही शरद पवारांना विनंती केली, आमची आणि भाजपाची चर्चा झाली, मात्र आम्ही निर्णयावर कधीच आलो नाही.’ याचाच अर्थ शरद पवार यांनी त्यांची विचारधारा सोडली नाही. शरद पवार त्यांच्या विचारांवर ठाम राहिले. (Pune News) मी काँग्रेसची साथ सोडणार नाही, काँग्रेसचा विचार सोडणार नाही, हीच शरद पवार यांची भूमिका कायम होती.

 

सुप्रिया सुळे यांनी या वेळी भाजपच्या भ्रष्टाचाराचा पुरावा देण्यासाठी समरजीत घाटगेंचे उदाहरण दिले. घाटगे यांनी नेत्यावर आरोप केला होता. आता मी घाटगे यांना नागरिक म्हणून विचारते, घाटगे तुम्ही जे आरोप केले ती व्यक्ती आज तुमच्याच जिल्ह्याची पालकमंत्री आहे. (Pune News) म्हणजे तुम्ही केलेले आरोप खोटे होते का? नसेल तर भाजपने आता त्यांची माफी मागितली पाहिजे. तुम्ही त्या नेत्याच्या घरी ईडी पाठवली. त्यांच्या बायको, मुलं आणि नातवांचा छळ केला. नंतर तुमच्यासोबत घेतलं. हा भ्रष्ट व्यवहार नाही काय? असा सवाल त्यांनी केला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : अभिमानास्पद! पुण्याच्या लेकीनं गोल्ड मेडल जिंकलं, बापाच्या डोळ्यात आलं पाणी ; काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवे संचालक पार्थ पवार?

Pune News : विश्वास नेमका ठेवायचा कोणावर? जुन्नरनंतर पुण्यात पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग; रक्षकच बनताहेत भक्षक…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भोंदू खरातला जामीन की तुरुंगवास ? जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, आता नजर पुढच्या तारखेकडे!

Monday, 31 August 2026, 16:04

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या पुण्यात मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कर्मचारी

Monday, 31 August 2026, 15:55

पुण्यात प्रेमाचा धक्कादायक शेवट! कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; प्रियकराला अटक

Monday, 31 August 2026, 15:53

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

Monday, 31 August 2026, 15:37

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09
Next Post

Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथे सहा जणांच्या टोळक्याने रिल्स बनवण्यासाठी केला 'शिवशाहीचा' पाठलाग, शेवटी अपघात झाल्यावर ड्रायव्हरलाच चोपले ; दुपारी दीडची घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp