पुणे: व्हॉट्सअॅप बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 5 मे पासून अनेक स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. सुरक्षेच्या बाजू विचारात घेता व्हॉट्सअॅपने हा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅप दरवर्षी अशा फोनची यादी जारी करते, जे फोन खूप जुने आहेत आणि ज्यांच्यासाठी कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट्स देणे बंद केले आहे.
WhatsApp केवळ iOS 15.1 किंवा त्यावरील व्हर्जनवर काम करणार आहे. म्हणजेच ज्या वापरकर्त्यांकडे iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6 Plus आहेत. त्यांच्या फोनवर आता व्हॉट्सअॅप चालणार नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय व्हॉट्सअॅपने घेतला आहे. व्हॉट्सअॅप चालवण्यासाठी या वापरकर्त्यांना आता नवीन फोन घ्यावा लागेल.