पुणे प्राईम न्यूज: व्हॉट्सअॅप दररोज आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स आणत आहे आणि ते अधिकाधिक वापरकर्त्यांसाठी अनुकूल बनविण्यात व्यस्त आहे. अलीकडील WABetaInfo अहवालानुसार मेटाचे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप इमेज, व्हिडिओ आणि GIF ला झटपट रिप्लाय देण्यासाठी एक नवीन रिप्लाय बार फिचर आणत आहे. याच्या मदतीने युजर्स कोणत्याही मेसेजला त्वरीत उत्तर देऊ शकतील. यासाठी वापरकर्त्यांना गुगल प्ले स्टोअरवरून Android 2.23.20.20 अपडेटसाठी नवीन व्हॉट्सअॅप बीटा इंस्टॉल करावे लागेल. यानंतर त्यांना व्हॉट्स अॅपवर फोटो आणि व्हिडिओला रिप्लाय देण्याची सुविधा उपलब्ध होईल.
कसे शोधायचे?
सर्वप्रथम व्हॉट्स अॅप ओपन करा. यानंतर तुम्ही कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा GIF ओपन केल्यावर तुम्हाला हे फीचर दिसेल. काही वापरकर्त्यांना यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. WABetaInfo नुसार, नवीन रिप्लाय फीचर वापरकर्त्यांना वर्तमान स्क्रीन न सोडता चॅटमधील विशिष्ट मीडिया फाइलला त्वरित उत्तर देण्याची परवानगी देते. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर संवाद साधणे सोपे होते.
व्हॉट्सअॅपने सर्वप्रथम आणले चॅनल फीचर
व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच चॅनल फीचर आणले होते. राजकारणापासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक बड्या व्यक्तींनी स्वतःचे व्हॉट्सअॅप चॅनेल तयार केले आहेत. कोणताही वापरकर्ता व्हॉट्सअॅप चॅनेल तयार करू शकतो आणि त्याच्या फॉलोअर्ससोबत मेसेज, फोटो इत्यादी शेअर करू शकतो. हे वन वे कम्युनिकेशन आहे. ज्यामध्ये अॅडमिन वापरकर्त्यांसह बातम्या, व्हिडिओ इत्यादी सामायिक करू शकतो आणि फॉलोवर्सदेखील त्यावर कंमेंट्स करू शकतात. चॅनल फॉलोअर्स त्याच चॅनलशी कनेक्ट केलेले इतर लोक पाहू शकत नाहीत आणि चॅनल अॅडमिनही लोकांचे नंबर पाहू शकत नाहीत.