नवी दिल्ली : Vodafone-Idea अर्थात Vi ही कंपनी ग्राहकांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्लॅन घेऊन येत आहे. त्यात भारतात आता 5G मोबाईल इंटरनेट सेवा सुरू झाल्यापासून, Vi कडे सर्वांचे लक्ष लागले होते. Jio आणि Airtel च्या तुलनेत, कंपनीने 5G सेवा खूप उशीरा सुरु केली आहे.
Vi ने आपली 5G सेवा मुंबईत लाईव्ह केली आहे. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही युजर्संना अनलिमिटेड 5G डेटा ऑफर करत आहे. प्रीपेड प्लॅन्स 299 रुपयांपासून सुरू होतात, तर पोस्टपेड प्लॅन्सची किंमत अमर्यादित 5G साठी 451 रुपये असणार आहे. Vi ची ऑफर Jio-Airtel पेक्षा वेगळी असणार आहे. सध्या हा अनलिमिटेड 5G फक्त मुंबईतील युजर्सना दिला जाईल. Vi च्या वेबसाईटवर एक नवीन पेज देखील सुरु करण्यात आले आहे. पेजवर 5G सेवेची माहिती दिली आहे.
Vi ने सांगितले की, त्यांची अनलिमिटेड 5G सेवा ही एक विशेष ऑफर असणार आहे, जी काही काळासाठी असेल. मात्र, कंपनी त्या प्लॅन्सवर अनलिमिटेड 5G ऑफर करत आहे, ज्यामध्ये दररोज 1 GB डेटा दिला जातो. जर युजर्स Vi च्या 5G नेटवर्कशी कनेक्ट झाले आणि इंटरनेट वापरत असतील तर त्यांना डेटाची चिंता नसेल, असेही म्हटले आहे.