नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo भारतात लवकरच आपला शक्तिशाली स्मार्टफोन Vivo X200 FE लाँच करण्याची शक्यता आहे. Vivo कडून Vivo X200 Pro Mini च्या जागी हा नवा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. गेल्यावर्षी, Vivo ने भारतात X200 आणि X200 Pro लाँच केले होते. त्यात आता Vivo कडून X200 Pro Mini आणि X200 Ultra स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे.
Vivo भारतात Vivo X200 Pro Mini ऐवजी Vivo X200 FE आणणार आहे. त्यामुळे X200 Mini ची वाट पाहणाऱ्या युजर्ससाठी आणखी वाट पाहण्याची वेळ आली आहे. Vivo चा X200 Ultra भारतात येण्याची आशा अजूनही कायम आहे. एका संकेतस्थळानुसार, Vivo X200 FE जून 2025 च्या अखेरीस भारतात लाँच केला जाऊ शकतो.
Vivo X200 Ultra सोबत लाँच केला जाऊ शकतो. Vivo X200 FE मध्ये डायमेन्सिटी 9400e चिप वापरली जाऊ शकते. या चिपसह येणारे हा पहिला डिव्हाईस असू शकतो. डायमेन्सिटी 9400 E चिपसेट हा डायमेन्सिटी 9400 चा हलका प्रकार असू शकतो. या फोनमध्ये, 6.31 इंचाचा कॉम्पॅक्ट 1.5K LTPO OLED डिस्प्ले असू शकतो. जो 120 Hz चा रिफ्रेश रेट आणू शकतो. यात 50 मेगापिक्सेलचा मुख्य, टेलिफोटो आणि सेल्फी कॅमेरे असण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच तिन्ही कॅमेरे 50 मेगापिक्सेलचे असू शकतात. कंपनीने या फोनच्या किमतीबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.