नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Unix ने आपले नवीन इअरबड्स लाँच केले आहेत. युनिक्स मॅट्रिक्स इअरबड असे याचे नाव आहे. यातील सर्वांत बेस्ट फीचर म्हणजे याची बॅटरी लाईफ. या इअरबड्सला पूर्ण चार्ज केल्यावर 40 तासांचा प्ले-बॅक मिळू शकतो, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
या इअरबड्सला चांगली पसंतीही मिळत आहे. हा इअरबड्स पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त एक तास लागतो आणि एकदा का हा फुल्ल चार्ज झाला तर मग तुम्हाला 40 तासांचा बॅकअप मिळू शकतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. हे केससह एकूण 40 तास प्लेबॅक देतो. यात फास्ट चार्जिंगचा सपोर्टदेखील आहे. त्यानुसार, पाच मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 3 तासांचा प्लेटाईम देण्यात आला आहे.
याच्या कनेक्टिव्हिटीसाठी इअरबड ब्लूटूथ व्हर्जन V5.3 ला सपोर्ट करतात आणि त्याची रेंज 10 मीटर इतकी आहे. यामध्ये टच कंट्रोल उपलब्ध असून, याच्या माध्यमातून गाणी, फोन कॉल्स इतकेच नाहीतर व्हॉईस असिस्टंटही आहे. यात 4 मायक्रोफोन सेटअप देण्यात आला आहे. याच्या माध्यमातून नॉईस कॅन्सलेशनही मिळू शकते.