सध्या WhatsApp, Instagram, Facebook यांसारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात WhatsApp एका खास फीचरवर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने, आपण कोणत्याही चॅटसाठी कोणतीही थीम वापरू शकणार आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने हे फीचर आणण्यास सुरुवात केली आहे.
केवळ अँड्रॉईड बीटा व्हर्जनच्या युजर्ससाठी हे फीचर असणार आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या फीचरवर काम करत आहे. त्याच्या मदतीने तुम्ही विशिष्ट चॅटसाठी विशिष्ट थीम निवडण्यास सक्षम असाल. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या चॅटसाठी वेगवेगळ्या थीम निवडू शकता. तुम्हाला सर्व चॅटसाठी थीम निवडण्याची आवश्यकता नाही.
युजर्सला 20 रंगांचा पर्याय मिळणार आहे. त्यापैकी ते स्वतःसाठी कोणताही रंग निवडू शकतील. याशिवाय युजर्सकडे 22 टेक्स्ट थीमचा पर्यायही असेल. या दोन्हींचा वापर करून तुम्ही अनेक भिन्न थीम तयार करू शकता.