नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी Realme ने भारतात आपला नवा 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme P3 5G असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची बॅटरी यांसह इतर अनेक बेस्ट फीचर्स देण्यात आले आहेत. इतकेच नाहीतर हा फोन तुम्हाला 20000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळू शकणार आहे.
Realme P3 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. P सीरीजमधील कंपनीचा हा नवीन मॉडेल असणार आहे. हा फोन 19 मार्चला लाँच केला जाणार होता. पण, कंपनीने दोन दिवस आधी आणला आहे. Realme P3 5G मध्ये 6000 mAh बॅटरी आहे, जी 45 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. हा भारतातील पहिला फोन आहे, ज्यामध्ये Snapdragon 6 Gen 4 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन किमान 6 GB रॅमसह येतो आणि 50 मेगापिक्सेलचा मुख्य रियर कॅमेराही आहे. फोनची सुरुवातीची किंमत 16999 रुपये आहे.
Realme P3 5G स्पेस सिल्व्हर, कॉमेट ग्रे आणि नेबुला पिंक या तीन कलरमध्ये आणण्यात आले आहे. त्याची किंमत 6GB + 128GB मॉडेलसाठी 16999 रुपये आहे. 8GB + 128GB मॉडेलची किंमत 17999 रुपये आहे आणि टॉप मॉडेल 8GB + 256GB 19999 रुपयांना खरेदी करता येईल. Realme च्या अधिकृत वेबसाईटवर हा फोन तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आला आहे.