नवी दिल्ली : सध्या Realme ने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन Realme C75 5G लाँच केला आहे. हा फोन बजेट कॅटेगरीमध्ये मिळत आहे. Realme चा हा फोन 5G कनेक्टिव्हिटी आहे. यात 6.68 इंचाचा मोठा डिस्प्ले असून, जो 120Hz चा रिफ्रेश रेट देतो.
Realme च्या या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी असून, जी 45W फास्ट चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. दोन कॅमेऱ्यांसह येणारा हा नवीन Realme फोन नवीन Android 15 वर चालतो. त्याची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. Realme C75 5G हा फोन तीन रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. लिली व्हाईट, मिडनाईट लिली आणि ब्लॉसम पर्पल असे कलर असणार आहेत.
4GB+128GB मॉडेलची किंमत 12999 रुपये असून, 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत 13999 रुपये आहे. Realme C75 5G मध्ये 6.67-इंचाचा LCD डिस्प्ले आहे जो HD रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट देतो. या फोनमध्ये 4GB RAM देण्यात आला आहे.