नवी दिल्ली : तुम्हालाही एखाद्याचे वारंवार कॉल येणे आवडत नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. तुम्हाला Call Receive करण्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण हे काम आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे देखील केले जाऊ शकणार आहे.
Google आता Pixel फोनसाठी AI Replies नावाच्या फीचर्सवर काम करत आहे. ज्यानंतर AI पिक्सेल फोन युजर्संना येणाऱ्या कॉलला उत्तर देईल. Google या नवीन AI Replies फीचर्सह कॉल स्क्रीन फीचर्समध्ये आणखी सुधारणा करत आहे. गुगलच्या फोन ॲपच्या नवीन बीटा व्हर्जनवरून ही माहिती प्राप्त झाली आहे. Google AI रिप्लायवर काम करत असल्याचे म्हटले जात आहे. Pixel Phone मध्ये आधीपासूनच कॉल स्क्रीन फीचर्स असून, जे तुम्हाला येणारे कॉल मॅनेज करण्यात मदत करते.
हे नवीन फीचर लाँच करण्यात आले होते आणि ते तुम्हाला अनोळखी नंबर किंवा टेलिमार्केटरसारख्या कॉलर्सचे कॉल आले तर याची माहिती मिळू शकणार आहे. ज्याच्या माध्यमातून कॉल करणाऱ्याशी अधिक कुशलतेने संवाद साधता येऊ शकतो. जर एखाद्याने कॉल केला आणि तुमचा फोन स्क्रीन करत असेल तर, कॉलरने काय सांगितले यावर आधारित AI Reply ही आता देऊ शकणार आहे.