नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Motorola ने भारतात आपला नवा Moto Edge 60 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. या एक मिड-रेंजचा स्मार्टफोन असून, यामध्ये 50MP चे 3 कॅमेरे देण्यात आले आहेत. तर 6000mah ची दमदार बॅटरीही यामध्ये असणार आहे.
Motorola ने या फोनमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि अनेक अत्याधुनिक फीचर्स देखील या फोनमध्ये दिले आहेत. Motorola ने या फोनमध्ये योग्य किंमत ठेवून अनेक फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक चिपसेट, मोठी बॅटरी, जास्त रॅम, सॉफ्टवेअर सपोर्टसह क्वाड कर्व्ह डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यावेळी मोटोरोलाने बॉक्समधून काही गोष्टी कमी केल्या आहेत. मोटोने त्यांच्या फोन बॉक्समधून कव्हर काढून टाकले आहे. त्यामुळे जर तुम्हाला कव्हर हवा असेल तर वेगळा खर्च करावा लागेल.
Moto Edge 60 Pro या स्मार्टफोनमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. 8GB+256GB व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 29999 रुपयांपासून सुरू होते. त्याचा 12GB+256GB व्हेरिएंट 33999 रुपयांना उपलब्ध असेल. लाँच ऑफर म्हणून, तुम्हाला 1000 रुपयांची त्वरित डिस्काउंट आणि 1000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो.