नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. त्यात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava ने आपला शार्क सीरीजचा नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. हा एक बजेट फोन आहे. यामध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे हा फोन तुम्हाला 6999 रुपयांमध्ये मिळू शकणार आहे.
Lava फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, मोठा डिस्प्ले, 4 GB रॅम असे फीचर्स असणार आहेत. मात्र, हा फोन 5G नसणार आहे. ज्यांना फीचर फोनवरून स्मार्टफोनवर स्विच करायचे आहे, त्यांच्यासाठी हा फोन बेस्ट असा ठरणार आहे. Lava च्या नवीन फोनचे नाव Lava Shark असे आहे. कंपनी युजर्संना कमी किमतीत 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा AI रिअर कॅमेरा आहे.
Lava Shark ची किंमत 6999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन टायटॅनियम गोल्ड आणि स्टेल्थ ब्लॅक कलप ऑप्शनमध्ये मिळणार आहे. हा फोन लावाच्या रिटेल स्टोअर्सवर या महिन्यापासून उपलब्ध होईल. कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटीही मिळत आहे. या फोनमध्ये 64GB External Storage ही देण्यात आली आहे. SD कार्ड टाकून ही स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.