पुणे: तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे की, स्मार्टफोनच्या मदतीने कोणीही तुमचे लोकेशन ट्रॅक करू शकते. असं झालं तर तुमची सर्व गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हाला कोण ट्रॅक करत आहे हे तुम्ही खालील टिप्स द्वारे जाणून घेऊ शकता.
सुरूवातील तुम्ही स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा. त्यानंतर खाली स्क्रोल करा. गुगल ऑप्शनवर या. गुगल ऑप्शनवर टॅप करा. यानंतर तुम्हाला अकाउंट ऑप्शनवर टॅप करावे लागेल. गुगल अकाउंटवर पोहोचल्यानंतर, तुम्ही मॅनेज युवर गुगल अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तेथे तुम्हाला गुगल अकाउंटमध्ये पीपल अँड शेअरिंगचा ऑप्शन मिळेल. यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ज्या लोकांसोबत तुम्ही तुमचे लोकेशन शेअर केले आहे त्यांची लिस्ट मिळेल. येथे तुम्ही लोकेशन शेअरिंग देखील बंद करू शकता.
अॅपच्या लोकेशन अॅक्सेसची माहिती देखील तुम्हाला मिळेल. याबरोबरच फोनमधील कोणते अॅप्लिकेशन तुमचे लोकेशन ट्रॅक करत आहे याची माहिती देखील तुम्हाला मिळेल. यासाठी तुम्ही सेटिंग्ज ऑप्शनवर जा. लोकेशन ऑप्शनवर टॅप करा. यानंतर अॅप परमिशनवर जा. येथून तुम्ही शोधू शकता की कोणत्या अॅपला तुमच्या लोकेशनचा अॅक्सेस आहे.