पुणे प्राईम न्यूज डेस्क: होळी खेळत असताना होळीला घराबाहेर पडणं म्हणजे पाणी आणि रंगांमध्ये भिजणं. मात्र होळीच्या दिवशी फोन पाण्यात भिजला तरी काळजी करू नका. काही बाबी लक्षात ठेऊन तुम्ही तुमचा मोबाईल परत चालू करू शकता. चला तर मग जाणून घेऊ फोन भिजल्यास तुम्ही पहिल्यांदा काय करायला हवं.
सर्वांत अगोदर तुमचा फोन बंद करा
जर तुम्हाला वाटत असेल की फोनमध्ये पाणी गेलं आहे, तर तो तात्काळ बंद करा. फोन बंद केल्याने शॉर्ट सर्किट होण्याचा धोका कमी होईल. यामुळे फोनचे मोठे नुकसानापासून वाचवता येईल. त्यानंतर तत्काळ सिम कार्ड काढा. तुम्ही मेमोरी कार्ड वापरत असाल, तर तेही बाहेर काढा. पाणी गेल्याने हे खराब होण्याची शक्यता असते.
तत्काळ फोन कोरडा करा किंवा उन्हात ठेवा
तुमच्या पाण्यात भिजलेल्या फोनला कोरडं करण्यासाठी त्याला हवेच्या जागी ठेवा. किंवा थोडा वेळ उन्हात ठेवा. तसेच तुम्ही त्याला पंख्याच्या समोरही ठेवू शकता. फोन झटकून चार्जिंग पोर्ट आणि इतर ठिकाणांहून पाणी काढून टाका.
वरील उपाय करूनही फोन चालू होत नसेल, तर त्याला सर्व्हिस सेंटरवर नेवून तपासून घ्या. तुम्ही घरच्या घरी फोन खोलुन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका. असं केल्याने तुमच्या मोबाईलचे नुकसान होऊ शकते.