नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. फीचर्सनुसार, या स्मार्टफोनच्या किमतीही ठरत आहेत. असे असताना प्रसिद्ध कंपनी Nokia ची कंपनी HMD ने Pink Barbie Flip फोन लाँच केला आहे. या फोनचा लूक आणि डिझाईन बार्बी कॅरेक्टरसारखाच असल्याचे दिसत आहे.
Barie च्या या फ्लिपफोनमध्ये दोन स्क्रीन असणार आहेत. सध्या HMD Barbie Flip हा फोन अमेरिकेत लाँच झाला आहे. फोनची किंमत 129 डॉलर्स म्हणजेच सुमारे 10,800 रुपये आहे. हा फोन 1 ऑक्टोबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. Pink Barbie Flip फोन सोबत कंपनी बॅटरी आणि इन-बॉक्स यूएसबी टाईप-सी चार्जर देत आहे. भारतात लाँच होण्यापूर्वीच या फोनची क्रेझ वाढल्याचे दिसत आहे.
या फोनमध्ये मोठी बॅटरी यासह अनेक पॉवरफुल असे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनचे डिझाईन पाहून तुम्हालाही लहानपणीचा Barbie फोन नक्कीच आठवेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. HMD Global ने हा फोन वर्षाच्या सुरुवातीला आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2024) मध्ये सादर केला होता.