नवी दिल्ली : बेस्ट सर्च इंजिन अशी ओळख असलेल्या Google ने Google Pay नंतर आता Google Wallet ही लाँच केले आहे. गुगलची ही वॉलेट सेवा गुगल पे पेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. या Google Wallet मध्ये युजर त्यांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, गिफ्ट कार्ड इत्यादी डिजिटल स्वरूपात ठेवू शकतील.
गुगल इंडियाने डिजिटल वॉलेट लाँच केले आहे. याचा वापर करताना ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. गुगलने भारतात फक्त अँड्रॉईड युजर्ससाठी आपले वॉलेट लाँच केले आहे. या खाजगी डिजिटल वॉलेटमध्ये युजर त्यांचे कार्ड, तिकिटे, पास आणि आयडी ठेवू शकतील. गुगलचे हे वॉलेट डिजिलॉकरसारखे असेल, ज्यामध्ये युजर आर्थिक डेटा डिजिटल स्वरूपात ठेवू शकतील.
Google Wallet च्या माध्यमातून फक्त डेबिट कार्डच नाहीतर क्रेडिट कार्ड, गिफ्ट कार्डही डिजिटल स्वरूपात ठेवता येणार आहे. याचा फायदा असंख्य युजर्सना होणार आहे.