नवी दिल्ली : सध्या गुगल मॅप्सचा वापर वाढला आहे. कोणतेही अज्ञात ठिकाण असो किंवा रस्ता ते शोधण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. आपल्या युजर्ससाठी गुगल मॅप्सकडून विशेष खबरदारीही घेतली जात आहे. त्यात आता तुम्ही जेव्हा गुगल मॅप्सचा वापर कराल तेव्हा तुम्हाला अचूक रस्ता समजण्यास मदत होऊ शकेल.
गुगल मॅप्समधील कोणताही मार्ग तुम्हाला समजत नसेल, तर फोन हातात धरून ठेवा. हे केल्यानंतर, फोनचा कॅमेरा लोड होईल आणि त्यानंतर मार्गांवर अॅरोच्या खुणा तयार होतील. यानंतर हे अॅरो तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे हे सांगतील.
हे नक्की फॉलो करा…
– सर्वप्रथम तुमच्या डिव्हाईसमध्ये Google Maps ॲप उघडा.
– यानंतर तुम्हाला जिथे जायचे आहे ते ठिकाण एंटर करा.
– त्यानंतर तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणाचे लाईव्ह लोकेशन टाका.
– यानंतर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार मोड निवडावा लागेल. दुचाकी, चारचाकी, बस आणि पायी असे पर्याय आहेत.
– मग तुम्हाला चालण्याचा मोड निवडावा लागेल. हे केल्यानंतर, सेल्फी घेण्यासारखे फोन सरळ धरा.
– हे केल्यानंतर फोनचा कॅमेरा लोड होईल.
– फोनचा कॅमेरा लोड केल्यानंतर लाईव्ह मोड चालू होईल. यानंतर, अॅरोच्या मदतीने तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे हे मार्ग दर्शवेल.