नवी दिल्ली : सध्या Facebook, Instagram, WhatsApp यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. या कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी अनेक फीचर्सही दिले जात आहेत. त्यात आता Facebook, Instagram ला टक्कर देण्यासाठी ChatGPT ची तयारी सुरु झाली आहे. त्यानुसार, OpenAI कडून एक मोठं चॅलेंज मिळू शकणार आहे.
OpenAI एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करत आहे, ज्यामध्ये AI फीचर्सचा समावेश असणार आहे. हे एक असे अॅप असेल जे X आणि Meta सारख्या प्लॅटफॉर्मना टक्कर देईल. हे अॅप ChatGPT वर देखील आधारित असू शकते. OpenAI देखील एक्ससारखे सोशल नेटवर्क तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. एक्सचे पूर्वीचे नाव ट्विटर होते, जे मस्क यांनी विकत घेतल्यानंतर बदलण्यात आले. OpenAI ने त्यांच्या अॅपचा प्रोटोटाईप पूर्ण केल्याचे म्हटले जाते. त्यात ChatGPT क्षमता असेल. या अॅपमध्ये एक पब्लिक फीड सेक्शन असेल, ज्यामध्ये लोक त्यांच्या फिलिंग व्यक्त करू शकतील.
फेसबुक आणि इन्स्टापेक्षा वेगळे असेल अॅप
रिपोर्ट्सनुसार, OpenAI ज्या अॅपवर काम करत आहे ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामपेक्षा वेगळे असेल. फेसबुक-इन्स्टाने त्यांच्या अॅपमध्ये एआय फीचर्स जोडले आहेत, परंतु OpenAI च्या अॅपमध्ये एआयसह सोशल एक्सपिरिअन्सचा समावेश असेल. याचाच अर्थ असा की, AI ची भूमिका सामान्य लोकांपेक्षा जास्त असणार आहे.