नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी boAt ने नुकतेच त्यांचे पहिले स्मार्टवॉच Lunar Pro LTE लाँच केले आहे. boAt चे पहिलेच स्मार्टवॉच आहे ज्यामध्ये eSIM सपोर्ट आहे. यात गोल डिझाइनसह दोन बटणे आहेत, ज्यामुळे ते स्टाइलिश दिसते. कंपनीने आता अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत या स्मार्टवॉचची विक्री सुरू केली आहे.
BoAt च्या इतर स्मार्टवॉचच्या तुलनेत Lunar Pro LTE थोडे वेगळे आहे, कारण त्यात eSIM वापरून LTE कॉलिंग करता येते. आता तुम्ही फोनशिवाय या स्मार्टवॉचवर थेट कॉल करू शकता, मेसेज पाठवू शकता आणि ब्लूटूथ कॉलिंग देखील करू शकता आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे boAt ने Jio सोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे Jio युजर्स या फिचर्सचा आनंद घेऊ शकतात.
boAt Lunar Pro LTE
यात एक जबरदस्त 1.39 इंच AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच हेल्थ फ्रीकने भरले आहे. या स्मार्टवॉचच्या माध्यमातून तुमच्या हृदयाचे ठोके, ऑक्सिजन पातळी आणि झोपेविषयी अलर्ट राहता येणार आहे. इतकेच नाहीतर यामध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत. या स्मार्टवॉचची बॅटरी लाईफही चांगली आहे. बॅटरी सामान्य वापरात 7 दिवसांपर्यंत चालू शकते. तर ई-सिम कॉलिंगसह 2 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळू शकतो.