सध्या WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कंपनीकडूनही युजर्सच्या दृष्टीने अनेक फीचर्स आणले जात आहेत. पण, या WhatsApp चा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
WhatsApp सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर पाठवलेले ॲप्स इन्स्टॉल करू नका. कारण, या लिंक्स अनेकदा फसव्या असतात, युजर्सची फसवणूक करण्यासाठी असतात. याव्यतिरिक्त, कोणतेही आर्थिक सेवा ॲप वापरण्यापूर्वी, विश्वसनीय प्लॅटफॉर्मवर त्याचे रेटिंग तपासा. फसवणूक टाळण्यासाठी सायबर तज्ञ लोकांना सावध राहण्याचा सल्ला देतात. विशेषत: पैसे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी. सायबर सेलने पैसे गुंतवण्यापूर्वी ॲप्स आणि प्लॅटफॉर्म तपासण्याचा सल्ला दिला आहे.
WhatsApp चा वापर जगभरात वाढला आहे. कोणतेही काम करायचं असल्यास WhatsApp चा वापर केला जातो. त्यामुळे युजर्सही वाढले आहेत. हीच गरज लक्षात घेता सायबर तज्ज्ञांकडून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.