नवी दिल्ली : आपल्यापैकी बरेच जण लॅपटॉपचा वापर करत असतील. पण, लॅपटॉप वापरताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यात स्क्रीन साफ करताना नेमकी कशी साफ करावी, हे समजत नसते. मात्र, लॅपटॉपची स्क्रीन साफ करताना मायक्रोफायबर कापडचा वापर करावा.
मायक्रोफायबर कापड हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण यामुळे स्क्रीन स्क्रॅच होत नाही. कीबोर्ड आणि इतर लहान भागांमधून धूळ काढण्यासाठी काही गॅजेट्सचा वापर नक्की करा. कॉटन बड्सही फायद्याचे ठरू शकतात. लहान जागा स्वच्छ करण्यासाठी हे बड्स वापले जाऊ शकतात. स्क्रीन साफ करण्यापूर्वी लॅपटॉप नेहमी बंद करा. मायक्रोफायबर कापडाने ते करण्याचा प्रयत्न करा. मायक्रोफायबर कापड हलक्या पाण्यात बुडवून काढा. कापड जास्त ओले नसेल हे देखील लक्षात घ्या.
मायक्रोफायबर कापड स्क्रीनवर हळूवारपणे हलवा. तुम्ही कोरड्या कापडानेही पुसून टाकू शकता. स्वच्छ मायक्रोफायबर कापडाने स्क्रीन कोरडी पुसून टाका. कीबोर्डला उलटा करा आणि त्यावर चिकटलेली धूळ काढण्यासाठी हलक्या हाताने हलवा. कीबोर्डमधील मोकळ्या जागेतून धूळ काढण्यासाठी कॉम्प्रेस्ड एअरचा कॅन वापरा. याने देखील फायदा होऊ शकतो.