नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इअरबड्स यांसारखे गॅजेट्स अगदी ऑनलाईनसह ऑफलाईन मार्केटमध्येही मिळत आहेत. असे असताना Apple कडूनही फोन, वॉच, इअरबड्स यांसारखे गॅजेट्स आणले गेले आहेत. त्यात Apple Watch मध्ये आता कॅमेराही मिळणार आहे.
Apple आता आपल्या भविष्यातील Apple Watch मॉडेल्समध्ये कॅमेरा आणण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय, या गॅजेट्सच्या मदतीने नवीन उपकरणांवरही लक्ष केंद्रित केले जाईल. येत्या काळात काही बदलही पाहायला मिळतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. हे यातील AI टेक्नॉलॉजी Apple च्या सध्याच्या व्हिज्युअल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाशी जोडली जाणार आहे. जे कंपनी एअरपॉड्समध्ये आणण्याचा विचार करत आहे. सध्या, व्हिज्युअल इंटेलिजन्स मुख्यत्वे ChatGPT आणि Google वर अवलंबून आहे. मात्र, Apple ला ते पूर्णपणे कंपनीच्या AI तंत्रज्ञानावर आधारित असावे असे वाटत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने काम देखील केले जात आहे.
Apple कडून Apple Watch आणि Ultra Watch या दोन्ही मॉडेल्ससाठी कॅमेरा मॉडेल विकसित केले जात आहेत. Apple Watch च्या डिस्प्लेच्या आत कॅमेरा देखील दिसेल. येथून तुम्ही कॅमेरा फोकस देखील करू शकता. यासारखीच कॅमेरा सिस्टिम तुम्ही आयफोनमध्येही पाहू शकता.