पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील जून-जुलै महिन्याचा हफ्ता बहिणींच्या खात्यात जमा झाला. पण ऑगस्ट आणि सप्टेबरचा हफ्ता अजून पर्यंत काही जमा झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिस-या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय ते कधी जमा होणार आहेत हेही स्पष्ट करत बहिणींना दिलासा दिला आहे.
नागपूर इथे इमारत बांधकाम कामगारांना किट वाटप करताना त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची ही महत्तवकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळाला असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच योजना घोषित झाल्यापासून आता पर्यंत या योजनेत अनेक अटी शर्तींमध्ये शिथिलता आणण्यात आली आहेत. जेणे करून महिलांसाठी सुलभ होईल. या योजनेत प्रत्येक महिलेला दरमहा पंधराशे रूपये दिले जाणार आहेत. पहिला हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. दुसऱ्या हफ्त्याची त्यांना आता प्रतिक्षा आहे.
यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, कॉंग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेस कोर्टामध्ये गेलं आहे. मात्र मी सांगतो ही योजना कधीही बंद होणार नाही. सुरुच राहणार आहे. आम्ही कोर्टात सांगितलं आहे की या योजनेसाठी आम्ही बजेटमध्ये पैसा ठेवला आहे. आम्ही कोणतीही योजना हवेत आणलेली नाही. आधीच्या कोणत्याही योजनेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे कॉंग्रेसने कितीही विरोध केला तरी ही योजना बंद होणार नाही असा मी शब्द देतो असे बोलताना ते म्हणाले.
या दिवशी जमा होणार पैसे…
ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे पैसे याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होतील असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही या योजनेंतर्गत वर्षाला 11 हजार म्हणजेच दर महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करत आहोत, याबद्दल माहिती दिली आहे.