लहू चव्हाण
पांचगणी ( सातारा ) : आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवल टीमने शहरातील प्रत्येक घटकाला एका छताखाई घेऊन आयोजित केलेल्या पांचगणी फेस्टिव्हलच्या आयोजनाबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शासनाच्या महसुल विभागाने याची दखल घेत फेस्टिवल समितीच्या सदस्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी फेस्टिवल टीम सदस्यांचा पाटीवर कौतुकाची थाप दिली.
फेस्टिवल टीमने नगरपालिका, पोलीस प्रशासन, रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लब, व्यापारी व हॉटेल असोसिएशन, पर्यटन महामंडळ, एसोएस संघटनेला बरोबर घेऊन मैत्री, बंधुत्व आणि जिव्हाळा असा त्रिवेणी संगम एकत्र करून फेस्टिवल आयोजित केला होता. या तीन दिवसीय फेस्टिवला आवर्जून जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी हजेरी लावली. सर्वांची एकता, आयोजन, शहरातील स्वछता, वाहतुक व्यवस्था व शिस्तीबाबत कौतुक केलं.
यावेळी बोलताना पाचगणी मंडलाधिकारी चंद्रकांत पारवे म्हणाले सर्वांनी स्वयंस्फूर्तीने, गावाच्या हितासाठी, स्वार्थ विरहित, एकत्र येऊन उत्कृष्ट कार्याची पावती दिली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कौतुक सोहळा घेण्याच्या सूचना दिल्या. आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलचे अध्यक्ष शिवाजी शिंदे म्हणाले ‘कौतुकाची थाप पडली की माणूस आनंदाने काम करतो, अजून उत्साह संचारतो” आणखी काम करण्याचे प्रोत्साहन मिळण्यासाठी महसूल विभागाने केलेला सत्कार कौतुकास्पद आहे. भूमी अभिलेख अधिकारी सचिन वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शासकीय अधिकारी गोरखनाथ यादव, तलाठी दिपक पाटील, संजय पवार यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर अन्य सदस्यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .फेस्टिव्हल निम्मित प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पांचगणी’ या स्मरणिकेच्या प्रती शिवाजी शिंदे, किरण पवार व मुख्य संपादक सुनील कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांना देण्यात आल्या.
यावेळी रोटरी अध्यक्ष स्वप्नील परदेशी ,सचिव नितीन कासुर्डे फेस्टिवलचे सचिव किरण पवार होते . कार्यक्रमास माजी अध्यक्ष राजेंद्र भगत तसेच फेस्टिवल कमिटीचे व रोटरी व रोट्रॅक्टचे सदस्य उपस्थित होते . सूत्रसंचालन जयवंत भिलारे तर आभार स्वप्नील परदेशी यांनी मानले.