Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तक प्रकाशन सोहळा शिवशाही थाटात; चक्क पालखीतून आणली गेली पुस्तकं

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 20:14

राजेंद्रकुमार शेळके

 

पुणे  : ग्रंथाली प्रकाशित आणि संजय नलावडे लिखित ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नंदलाल लॉन्स, ओतूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवशाही थाटात संपन्न झाला. ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकात साकारलेल्या शिवजन्मभूमीतील अडतीस व्यक्तिमत्वांना मानवंदना देण्यासाठी ही पुस्तकं पालखीतून मंगलवाद्य आणि तुतारीच्या निनादात मंचावर आणण्यात आली.

शिवनेरीभूषण डॉ. सदानंद राऊत, विनायक खोत, माजी सैनिक रमेश खरमाळे, ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी किरण कबाडी, अभियंते शिवाजीराव चाळक, शिवांजली साहित्यपीठ अशा अनेक दिग्गजांनी ही पालखी व ‘शिवनेरीची श्रीमंती’ खांद्यावर घेतली आणि खऱ्या अर्थाने आजच्या कर्तृत्ववान पिढीने आधीच्या पिढीतील कर्तृत्ववान मान्यवरांना मानवंदना दिली.

याप्रसंगी शिवजन्मभूमीचा उगवता तारा गायक मयुर सुकाळे यांनी पोवाडा सादर केला. तेव्हा संपूर्ण वातावरणात चैतन्य संचारले तर छोट्या दुर्गराज खोत याने गारद दिली तेव्हा सर्वांच्याच अंगावर रोमांच उभे राहिले. सुरवातीला गणेशपूजन दीपप्रज्वलन करून समारंभ सुरू झाला. जगप्रसिद्ध चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांचे अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळांकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच शिवनेरीची श्रीमंती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी केलेल्या ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकातीलच मराठीतील पहिल्या स्त्रीगझलकार संगीता जोशी, ज्येष्ठ कादंबरीकार द. स. काकडे, दुरदर्शन निर्माते अशोक डुंबरे, उद्योजक वसंतराव पोखरकर, लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, चित्रकार भास्कर हांडे आणि ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर या दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

‘उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या या युगात मावळतीच्या सूर्याला मुजरा करण्याची प्रेरणा मला शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या आशिर्वादाने मिळाली’ असे उद्गार लेखक संजय नलावडे यांनी ‘शिवनेरीची श्रीमंती’ या प्रकाशन सोहळ्यात काढले.

संजय नलावडे हे मूळचे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील परंतु नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये ते राहत असले तरी आपल्या जन्मभूमीशी त्यांची नाळ घट्ट रुतलेली आहे. सदर व्यक्तीचित्रणात्मक ग्रंथांमध्ये त्यांनी आपल्याच जुन्नर तालुक्यात जन्माला येऊन ज्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा डोलारा उभारून दीपस्तंभाप्रमाणे पुढील पिढ्यांना प्रकाशवाटा दाखवल्या अशा महान व्यक्तींची चरित्रात्मक कहाणी वाचकांच्या पुढ्यात ठेवली आहे.

याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, उद्योगपती विकास दांगट, ह.भ.प. गंगारामबुवा डुंबरे, ज्येष्ठ साहित्यिक सुधाकर घोडेकर, डॉ. ज्ञानेश्वर माउली थोरात, डॉ. लता पाडेकर, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र डुंबरे, ओतूरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन कांडगे, साहित्यिक सुरेश हांडे, कवयित्री रश्मी घोलप, ज्येष्ठ पत्रकार भरत अवचट, अनिल तांबे, मोहितशेठ ढमाले, देविदास तांबे, नंदुशेठ भोर, जालंदर उकिर्डे, पोपटराव नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी संजय गवांदे यांनी केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

MIT News : फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख – संतोष कटारिया

Saturday, 2 May 2026, 18:02

Speed ​​Bump : उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील गतिरोधक की मृत्यूचा सापळा? ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात ; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Saturday, 2 May 2026, 17:53

Pune Solapur Road Trafice : नायगाव चौकातील कोंडीला दिलासा! नवीन डिव्हायडर बदलामुळे वाहतूक सुलभ होणार

Saturday, 2 May 2026, 17:29

Pune Bribe : पुणे शहर पोलिस दलात खळबळ! सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला २८ लाखांची लाच घेताना रंगेहात जेरबंद

Saturday, 2 May 2026, 17:11

Pune Bailgada Sharyat Accident : करंदीतील बैलगाडा शर्यतीत दुर्दैवी घटना ; बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू..

Saturday, 2 May 2026, 17:00
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Bhigwan News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी ; उरुळी कांचन येथील कार्यक्रम उरकून गावी परतताना घडली दुर्घटना

Saturday, 2 May 2026, 16:16
Next Post

वाढत्या व्यसनाधीनतेला रोखण्यासाठी जनजागृती गरजेची : रणजित शिरोळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.