पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. विद्यमान आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यामध्ये तिढा’ निर्माण झाला असून त्याला सोडवण्याची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यामुळे परिचारक व अवताडे यांच्यामध्ये समिट घालवण्यात यशस्वी होणार का? हे थोड्याच वेळात कळणार आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी परिचारकांना थांबवून अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पांडुरंग परिवाराची व परिचारक गटाची आणि आपली सर्व ताकद अवताडेच्या मागे उभी करून या निवडणुकीत अवताडे यांना भगीरथ भालके यांच्या विरोधात यांना निवडून आणले होते. तेव्हा 2024 ची निवडणूक मी लढणार असे अलिखित नियम ठरला होता.
परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन चेहऱ्याला संधी देण्यास भाजप या मतदारसंघात इच्छुक नाही. विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना संधी दिली जाणार आहे. परंतु दुसरीकडे परिचारक हे अवताडे यांच्या कामकाजावर नाराज आहे. त्यांनी त्यांच्यावर टीकाही केली. तसेच त्यांनी आपले गट सांभाळण्यासाठी परिवार सांभाळण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या वाड्यावर जाऊन भेट घेत आहेत आणि मते जाणून घेत आहेत. निवडणूक लढण्यासाठी मागील 2014 आणि 2019 चा त्यांना पराभव हा जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे सध्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व पांडुरंग परिवार सावध भूमिका घेत आहे.
आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरचा तिढा सोडवून व समजूत काढून वाद मिटवण्याची जबाबदारी दिली आहे. यामध्ये काय घडते? हे आता लवकर कळणार आहे. अवताडे हे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पण अद्यापही त्यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर झालेली नाही.