सांगली: शहीद सैनिक नितीन कोळी यांची आई सुमन सुभाष कोळी यांनी मातृदिनानिमित्त मुलाची आठवण काढत २०१६ च्या दिवाळीची वेदनादायक आठवणी सांगितल्या. २८ ऑक्टोबर २०१६ रोजी नियंत्रण रेषेजवळ कर्तव्यावर असताना, पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या भीषण गोळीबारात नितीन हे जखमी झाले, ते तरीही धैर्याने लढले परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
नितीन यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांच्या पत्नी संपदा यांना फोन करून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगितले होते. सुमन कोळी सांगतात कि, आठ वर्षे त्याने देशाची सेवा केली,२८ ऑक्टोबर २०१६ हा दिवस कुटुंबासाठी काळा दिवस होता. तथापि, त्या माऊलीला तिच्या मुलाने देशासाठी दिलेल्या बलिदानाचा खूप अभिमान आहे. “माझ्या मुलाने देशासाठी आपले जीवन दिले याचा मला अभिमान आहे,” त्या म्हणाल्या कि, “नितीनसारख्या सैनिकांच्या बलिदानाचा बदला भारतीय सैन्य घेत असल्याचे पाहून समाधान वाटते.” दरम्यान, अशा असंख्य माऊली त्यांच्या शहीद पुत्रांच्या विरहात जगत असतील, अशा असंख्य माऊलींना सलाम!