Kolapur Crime: जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरहून तब्बल दहा लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Kolapur Crime Latest News)

काय आहे प्रकरण?
मृत विवाहितेचे नाव कौसर गरगरे (वय 30 वर्ष) असे असून, त्यांनी गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. कौसर यांचे सासरे राजमहंदर गरगरे हे कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार आहेत.
निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खर्चासाठी सासरच्या लोकांनी कौसर यांच्यावर माहेरहून 10 लाख रुपये घेऊन येण्यासाठी सतत दबाव आणण्यास सुरुवात केली होती. या आर्थिक मागणीसाठी त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
सासरकडून होणाऱ्या या असह्य त्रासाला कंटाळून कौसर यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर कौसर यांचे भाऊ अल्ताफ आवटी यांनी तातडीने कुरुंदवाड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा: मुद्रांक शुल्क भरण्याची मुदत संपली; अमेडिया कंपनीने निवडला थेट
फिर्यादीच्या आधारावर पोलिसांनी कौसर यांचा पती, सासू, सासरे आणि जावेच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ करणे आणि आर्थिक छळ यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत.
राजकीय चर्चांना उधाण
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबातील महिलेने केवळ निवडणूक खर्चाच्या आर्थिक दबावाखाली आत्महत्या केल्याने, या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. महिलांवरील वाढत्या आर्थिक व मानसिक छळाच्या मुद्द्यावर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोल्हापूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: आनंद गर्जेच्या वकिलांचा विवाह बाह्य संबंधाबाबत कोर्टात धक्कादायक दावा; म्हणाले…







