करमाळा (सोलापूर) : मतदार संघामध्ये एखादे नवीन सबस्टेशन मंजूर करून आणणे आणि प्रत्यक्ष त्याचे काम पूर्ण करून लोकार्पण करणे हे सोपे काम नाही. 2014 पर्यंत करमाळा तालुक्यामध्ये विजेची विशेष अडचण नव्हती. परंतु 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये एकही नवीन सबस्टेशन किंवा सबस्टेशनची क्षमता वाढ झाली नाही.त्यातच 2020 पासून दरवर्षी 100 टक्के पेक्षा अधिक पाऊस पडत गेला. उजनी धरणासह मांगी, कोळगाव, कुंभेज, कोंढेज हे प्रकल्प 100 टक्के भरले गेले. दहिगाव उपसा सिंचन योजना वर्षभरात सरासरी 260 दिवस चालली गेली. त्यामुळे वीज समस्येचा प्रश्न अतिशय गंभीर बनला होता.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे या प्रश्नावरती मात करण्याचे नियोजन केले गेले त्यातूनच 2019 ते 24 या कार्यकाळात आवाटी, रायगाव व राजुरी येथे नवीन सबस्टेशन मंजूर करून घेण्यात आली. त्यामध्ये आवाटी सबस्टेशनचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. रायगाव व राजुरी येथील सबस्टेशनचे कामही प्रगतीपथावर आहे. या नवीन सबस्टेशनच्या उभारणीबरोबरच मूळ सबस्टेशन ची क्षमता वाढ ही करण्यात आली. यामध्ये कात्रज, कोर्टी, पांडे, कविटगाव, दहिगाव, शेटफळ, कव्हे, म्हैसगाव, बारलोणी इ.सबस्टेशनची क्षमता वाढवून ते सुरू करण्यात आले आहेत.
त्याबरोबरच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमधून साडे येथील 5 MVA च्या सबस्टेशन साठी वीज पुरवठा कमी होत असल्याने त्या ठिकाणी वाढीव 10 MVA ट्रांसफार्मर चे काम सुरु आहे. तसेच वीट येथे वाढीव 5 MVA ट्रांसफार्मर, लव्हे येथे वाढीव 5 MVA ट्रांसफार्मर मंजूर झाले आहे. ही कामे जुलै अखेर पूर्ण होणार असल्यामुळे तालुक्यातील वीज समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. यावरच समाधान न मानता आ.संजयमामा शिंदे यांनी सोलापुरचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांना 19 जून 2024 रोजी निवेदन देऊन 10 सब स्टेशनची क्षमता वाढ करणे व 10 नवीन सबस्टेशन उभे करणे अशा 20 कामांसाठीचे निवेदन नुकतेच दिले आहे.
या सबस्टेशनची क्षमतावाढ करण्याची मागणी- (वाढीव ट्रान्सफॉर्मर बसविणे)
कोळगाव, झरे, केम, वीट, उमरड, कविटगाव, शेटफळ, करमाळा शहर, बारलोणी, चोभे पिंपरी