सोलापूर: विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ४० लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. त्यानुसार खर्च होतो की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने पथकांच्या नेमणूकाही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांना आता तोलून मापूनच खर्च करावा लागणार आहे. मात्र, दिवसभर प्रचारासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना तृप्त करण्यासाठी उमेदवारांना आता प्रत्येक मटन थाळीसाठी दीडशे ते दोनशे रुपयांचा खर्च गृहीत धरावा लागणार आहे. तर स्पेशल व्हेज थाळीसाठीचे दर १५० ते १८० रुपयापर्यंत निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे.
उमेदवारांच्या प्रत्येक खर्चावर निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने आता खाद्य पदार्थाचे दर ठरवून दिले आहेत. शहरी
भागात आणि ग्रामीण भागात हे दर वेगवेगळे आहेत. तसेच तो खर्च दैनंदिन खर्चातून निवडणूक आयोगाला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मर्यादेपेक्षा अधिक खर्च होत असेल तर त्यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. त्यामुळे मंडप, स्पीकर, रिक्षा, टेम्पो, सभा या ठिकाणाचेही दर निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत.
खाद्य पदार्थाचे दर पुढील प्रमाणे-
चहा-१०
नाष्टा-३०
थाळी- १९० ते २००
मटन थाळी- १२० ते १५०
लिंबू पाणी-१०
कोल्ड्रींक-२०
रस-२० ते २५