सोलापूर: प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाला एक धक्कादायक वळण आले आहे. डॉक्टरची सून डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्तामुळे अनेक तर्क वितर्क जोडले जात आहेत. डॉ. वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. प्रसिद्ध न्यूरो फिजिशियनने अचानक आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह अनेक व्यक्तींची चौकशी केली आहे. तपास सुरू असून डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या परिस्थितीचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर यांची सून डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील अचानक बेपत्ता झाल्याने या प्रकरणात गुंतागुंतीचे वळण आले आहे.
वृत्तानुसार, संशयित आरोपी डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील शेवटचे दोन दिवसांपूर्वी दिसले होते. काही सूत्रांचे म्हणणे आहे की, ते कदाचित अमेरिकेत गेले असतील, जिथे डॉ. शोनालीचा भाऊ राहतो. प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. डॉ. शिरीष यांच्या पत्नी डॉ. उमा यांनी हॉस्पिटलची सर्व सूत्रे होती घेतली आहेत. दरम्यान, समोर आलेल्या महितीनुसार डॉ. शोनाली 30 मे नंतर रुग्णालयात ओपीडी पाहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.