जिंती (सोलापूर): पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण, वृक्ष आपल्यासाठी खूप मदत करतात. वृक्ष आपल्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता त्यांच्यापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टी मनुष्याला विनामुल्य प्रदान करतात. झाडे म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेलं एक वरदान आहे. कोरोना काळात आपल्या सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. असे प्रतिपादन ॲड. नितीन राजेभोसले यांनी केले आहे.
वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने जिंती (ता. करमाळा) येथील आरोग्यवर्धनी केंद्राच्या परिसरात मंगळवारी (ता.23) वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन ॲड. नितीन राजेभोसले यांनी केले. यावेळी आरोग्यवर्धनी केंद्राचे आरोग्यअधिकारी डॉ. बाळासाहेब गाढवे, पोलीस उपनिरीक्षक कलिंदर मुलाणी, प्रकाश लोंढे, अक्षय धेंडे, स्वप्नील जगताप, नितीन कोकरे, सिकंदर मुलाणी, मोहन राऊत, अंकुश गुरगुळे, साजीद मुलाणी, संदिप जगताप, बलभीम महाराज पोटे, विजय वाघमोडे, रवींद्र धेंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. नितीन राजेभोसले म्हणाले, आपल्या संपूर्ण अस्तित्वात झाडांनी आपले जीवन टिकवून ठेवण्यास मदत केली आहे. त्यांच्याकडे व्यावहारिक आणि व्यावसायिक उपयोगांची विस्तृत श्रेणी आहे. लाकूड हे पहिले इंधन होते आणि अजूनही जगातील अर्ध्या लोकसंख्येचा वापर स्वयंपाक तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे झाडे आपल्यासाठी खूप काही करत असतील तर त्यांच्या संगोपनाची काळजी घेणे आणि त्यांना योग्य सूर्यप्रकाश, पाणी आणि सावली देणे हे आपले काम आहे. तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी झाडे लावली पाहिजेत, असे राजेभोसले यांनी यावेळी सांगितले.