करमाळा : रामवाडी (ता. करमाळा) येथे ऋषीकेश बाळासाहेब वारगड या शाळकरी मुलाचा बुधवार २९ मे रोजी भीमा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ऋषीकेश हा दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे बारावीत शिकत होता. नुकताच तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता.
तो भीमा नदीकाठी असलेल्या रामवाडीचा रहिवासी असून, बुधवारी सकाळी ९ वाजता नदीपात्रातील पाणबुडी मोटार पाहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे की आणखी काही कारणाने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कुगांव-कळाशी येथील दुर्घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने रामवाडी-जिंती परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.