नरखेड : मोहोळ तालुक्यातील देगाव (वा) येथील अंगणवाडी क्रमांक- 3 १च्या सेविकेचे राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म भरण्याचे काम सुरू असताना अंगणवाडीतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुधवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. सुरेखा रमेश आतकरे (४८) असे त्यांचे नाव आहे.
सध्या गावोगावच्या अंगणवाडी सेविकांवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने दिलेली आहे. त्यामुळे गावोगावच्या अंगणवाडी सेविका गावात घरोघरी फिरून् ‘नारी दूत’ या अॅपवरून फॉर्म भरत आहेत. देगाव (वा) येथील अंगणवाडी क्र.-१ येथे सुरेखा आतकरे या फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्या खुर्चीतच कोसळल्या.