बार्शी (सोलापूर) : गुळपोळी (ता. बार्शी) येथील स्वामी समर्थ गणेश उत्सव मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे गुरुवारी (ता. 12) आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या रक्तदान शिबिरात 121 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये पुरुष 110 तर 11 महिलांचा समावेश होता.
रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आणि न्यूनगंड असल्यामुळे महिलांचा त्यात नगण्य सहभाग असायचा; मात्र आता परिस्थिती बदलली असून रक्तदान शिबिरांतील महिलांचे प्रमाण वाढत आहे. आयोजित रक्तदान शिबिराला महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजातील गरजू रुग्णांना रक्ताची मदत व्हावी म्हणून मागील 14 वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. गुरुवारी घेतलेल्या रक्तदान शिबिरात 121 जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन सामजिक कार्यकर्ते अण्णासाहेब चिकणे व उपसरपंच कृष्णा चिकणे यांच्या करण्यात आले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शिरीष चिकणे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे, पोस्टमन लक्ष्मण काळे, गणेश म्हेत्रे, धनाजी मचाले, उद्योजक श्रीकृष्ण मचाले, धनाजी चिकणे (सर), उद्योजक बापू म्हेत्रे, नागेश बारवकर, भागवत चिकणे, योगेश चिकणे, अमर चिकणे, बालाजी बारवकर, गणेश बारवकर, काका लंगोटे, राहुल मचाले, यांच्यासह गावातील महिला, व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गुळपोळी गणेश उत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले, त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे तसेच रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण वर्ग सर्व मित्रमंडळी, सर्व मंडळ, महिला, भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल सर्व तरुण मंडळींचे आभार पोस्टमन लक्ष्मण काळे यांनी मानले.