हिंगोली : हिंगोली शहरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.शहरात एका लॉजमध्ये पंख्याला गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नंदिनी प्रतीक करवा असे आत्महत्या केलेल्या महिलेच नाव असून ही महिला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील रहिवासी आहे.
आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकांना मयत महिलेने फोनवर मेसेज करून कळविले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परंतु, आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. नंदिनी यांनी आपल्या बहिणीच्या नवऱ्याला केलेला शेवटचा मेसेज समोर आला आहे. त्यामध्ये आपल्या आत्महत्येस कुणाला जबाबदार धरू नये असं म्हणत दुसरं कारण असल्याचा उल्लेख केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर इथल्या नंदिनी विरेंद्र तिवारी हिचं दोन महिन्यांपूर्वीच रिसोड इथल्या प्रतिक कारवा सोबत लग्न झालं होतं. तर काही दिवसांपूर्वी नंदिनी तिच्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली होती. पण शनिवारी सकाळी अचानक घरातून निघून गेल्यानंतर ती लवकर परतली नाही. तेव्हा कुटुंबिय तिचा शोध घेत होते. परंतु नंदिनी यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलीस अधिक तपास करत आहेत.