हिंगोली : आजकाल मोबाईल फोनच्या वापराविना कुणी राहत नाही. मोबाईल फोन प्रत्येकाची गरज बनली आहे. पण हीच गरज एका शिक्षकाच्या जीवावर बेतली आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरेगावबांध येथे खिशातच मोबाईलचा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरेगावबांध येथे ही घटना घडली आहे. खिशात असणाऱ्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. त्यामध्ये शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. सुरेश संग्रामे असे त्या शिक्षकाचे नाव असल्याचे समोर आले आहे. नत्थू गायकवाड असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.