नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. गुरूवारी २८ मार्च रोजी सकाळी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. तर संध्याकाळी उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. काँग्रेसने रश्मी बर्वे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती, त्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. रश्मी बर्वें यांचे पती श्याम बर्वे यांनी डमी अर्ज भरल्याने आता तेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.
जात प्रमाणपत्र वैध नसल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. परंतु, त्यांचे पती श्याम बर्वे यांचा अर्ज मात्र ग्राह्य धरण्यात आला आहे.