Gondia News : गोंदिया : प्रेमात माणूस आंधळा होतो ही म्हण नक्की सगळ्य़ांनी एकली आहे. माणूस आंधळा होत नाहीतर त्याची विचार करण्याची बुद्धी कमी होते. मग तो मागचा पुढचा काहीच विचार करत नाही. फक्त प्रेम एके प्रेमच.. असं त्याच असत आणि त्यात जर नकार आला, तर विषयच संपला. मग प्रेम माघारी मिळावायला तो काय करेल हे सांगता येत नाही. असंच काहीस गोंदिया त पहायला मिळालं. प्रेमात आंधळ्या युवकाने अख्खं गाव हादरवलं. तो स्वत:चं आयुष्यचं संपवणार होता. तिच्या नकारामुळे खचलेल्या त्याने थेट 300 फुट मोबाईल टॉवरवर चढण्याचा प्रयत्न केला. सध्या तो सुखरूप आहे. त्याला वाचवण्यासाठी पोलिसांना कसून प्रयत्न करावे लागले.
देवरी तालुक्यातील चिंचगड येथील ही घटना आहे. तेथे राहणारा दिपक कुमार रजन कुंजाम (वय 24) या तरूणाचे छत्तीसगड राज्यातील तरुणीवर प्रेम होते. त्याने तिला लग्नासाठीही विचारले, मात्र तिने त्याच्याशी लग्न करण्यास थेट नकार दिला. यामुळे तो निराश झाला आणि गावातील मोबाईल टॉवर चढून त्याने त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती स्थानिकांनी चिचगड येथील पोलिसांना दिली. त्यानंतर ठाणेदार शरद पाटील व त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी त्या तरूणाशी मोबाईलवरून संपर्क साधला. तब्बल चार तास पोलीसांनी त्या तरूणाची मनधरणी करत समजूत काढायचा प्रयत्न केला. पण तो तरूण कुणाचेच, काहीही ऐकत नव्हता. अखेर ठाणेदार शरद पाटील यांनी स्वत:च त्या तरूणाचे प्राण वाचवायचे ठरवले. त्यांच्या आदेशानुसार, इतर पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत, त्याला मोबाईलवर बोलण्यात व्यस्त ठेवलं. आणि स्वत:च्या जिवाचे बरे वाईट करायचे नाही असे सांगून त्यांनी त्याला विश्वासात घेतले. त्याला आवश्यक असलेल्या इतर वस्तू जागेवर त्वरित उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मदतीने त्या तरुणाला चार तासांनी टॉवरवरून खाली उतरवत त्याचा जीव वाचवला.