वणी (यवतमाळ): यवतमाळ जिल्ह्यातील वणीमधील निळापूर-ब्राह्मणी रोडवरील जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग लागली. या आगीत दाजे दोन ते अडीच हजार क्विंटल कापूस व सरकी जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी काम करीत असलेल्या 25 मजुरांचे प्राण सुदैवाने वाचले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
वणीमधील कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगला ही आग लागली. यावेळी २५ मजूर फॅक्टरीत काम करीत होते. सुदैवाने या सर्वांचे प्राण वाचले आहेत. फॅक्टरीमध्ये जिनिंग प्रेसिंगचे काम ५६ स्पिन मशीनवर सुरू होते. कापूस वाहक पट्ट्यावर घर्षण होऊन ठिणगी उडाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.