बुलढाणा: मतदान साहित्य वाटपाच्या वेळी अनुपस्थित राहून कामात कसूर केल्याप्रकरणी नांद्राकोळी येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापकाविरूद्ध पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारसीनुसार तक्रार दाखल केली आहे.
निवडणूकविषयक कामकाजासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन १९ नोव्हेंबर रोजी मतदानाचे साहित्य वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी उच्च प्राथमिक शाळा नांद्राकोळी येथील मुख्याध्यापक भोजराज नारायण तोतरे मतदानाचे साहित्य वाटप होत असलेल्या ठिकाणी मतदान केंद्राचे साहित्य घेण्यास अनुपस्थित होते.
ही बाब निवडणूक कामकाजात अळथळा निर्माण केला असून लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कर्तव्यात कसूर केला आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारसीनुसार मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बुलढाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाब जिल्हा परिषदचे जिल्हा सेवा वर्तणूक नियम १९६७ मधील कलम ३ चा भंग केला आहे.