पुणे Twitter News : ट्विटर लवकरच काही नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. (Twitter News) लवकरच युजर्सना ट्विटरवर व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉलची सेवा उपलब्ध होऊ शकते, (Twitter News) जगभरात कुठेही फोन नंबर नसेल तरी तुम्ही याचा वापर करून फोन किंवा व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करू शकता. (Twitter News) त्यासाठी तुम्हाला फोननंबरची आवश्यकता लागणार नाही. (Twitter News) अशी माहिती ट्विटरचे मुख्य कार्यकारी एलन मस्क यांनी दिली आहे. (Twitter News) याबाबत मस्क यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. (Twitter News)
दोन नवीन फीचर लाँच
आतापर्यंत ट्विटरवर 60 शब्दांच आपलं म्हणणं मांडता येत होतं. त्याची मर्यादा वाढली असून आता फोन आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देखील ट्विटर आपल्या ग्राहकांना देणार आहे. ट्विटर डायरेक्ट मेसेजमध्ये दोन नवीन फीचर लाँच केले आहेत. रिप्लाय आणि नव्या इमोजी असे दोन फीचर युजर्ससाठी उपलब्ध असतील.
एलन मस्क यांनी सांगितलं आहे की, ‘लवकरच या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या हँडलने व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट करू शकाल, याच्या मदतीने तुम्ही फोन नंबरची देवाणघेवाण न करता जगभरातील कोणाशीही बोलू शकाल.’
काही दिवसांपूर्वी ब्लू टिकच्या मुद्द्यामुळे चर्चेत असणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता नवीन फिचर्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
FIFA-2022 वर्ल्डकपचा पहिला सामना ट्विटरवर दाखवणार; मस्क यांची घोषणा…!