पुणे : भारतात ड्रायव्हिंगचे नियम अतिशय कडक आहे. त्यात ट्रॅफिकच्या नियमांचे पालन न केल्यास अपघातही होऊ शकतो. हा अपघात कधीकधी जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळेच ड्रायव्हिंग करताना सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाईक चालवताना सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बाईकस्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीने डोक्यावर हेल्मेट घातले पाहिजे. काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असे अनेकांचे मत आहे. पण हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
अफवाहों से सावधान…!#TrafficFines #MotorVehicleAct pic.twitter.com/vd2gLu72i3
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) September 25, 2019
मोटार वाहन कायद्यामध्ये चप्पल किंवा सँडल घालून दुचाकी किंवा कार चालवू नये अशी कोणतीही तरतूद नाही. कायद्यात असा कोणताही नियम सांगण्यात आलेला नाही. त्यामुळे चप्पल घालून कार किंवा दुचाकी चालवल्यास दंड बसणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितलं की, चप्पल घालून दुचाकी चालवल्यास किंवा कमी कपडे घालून स्कूटर चालवल्यास दंड बसत नाही. चप्पल, हाफ स्लीव्ह शर्ट, लुंगी बनियान घालून गाडी चालवणे, गाडीची काच अस्वच्छ असणे किंवा गाडीत अतिरिक्त बल्ब न ठेवणे यासाठी चलनाची तरतूद नाही. अशा अफवांपासून सावध राहा, असे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
तसे बोलायचे झाले तर जर तुम्ही चप्पल घालून बाइकवरून रस्त्यावर निघालात तर ते तुमच्यासाठी जीवावर बेतू शकते. बाइक चालवताना चप्पल ही सोयीस्कर नसते. तुमचा चप्पलामुळे पाय घसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुचाकी चालवताना शूज घालण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले जाते.